अहिल्यानगर: दुभाजकावर धडकताच सीएनजीने पेट घेतला, पोलिसासह दोघांचा जळून कोळसा
Breaking News | Ahilyanagar Accident: दुभाजकाला चारचाकी गाडी धडकल्यानंतर वाहनातील सीएनजी गॅसने पेट घेतला आणि गाडीला आग लागली. या भीषण अपघातात दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याची दुर्दैवी घटना.
अहिल्यानगर: अहिल्यानगर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दुभाजकाला चारचाकी गाडी धडकल्यानंतर वाहनातील सीएनजी गॅसने पेट घेतला आणि गाडीला आग लागली. या भीषण अपघातात दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याही समावेश आहे. अहिल्यानगर येथील बीड रोडवर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्यात आली, परंतु तोपर्यंत दोघांचा जळून मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना आज, सोमवार २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीडकडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार क्रमांक MH 16 DM 5893 ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेलपाशी डिव्हायडरला धडकली आणि कारला आग लागली. आगीमध्ये २८ वर्षीय महादेव दत्ताराम काळे आणि ३५ वर्षीय धनंजय नरेश गुडवाल हे दोघे जळून मृत्युमुखी पावले आहेत. गुडवाल हे जामखेड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते.
नगर जिल्ह्यात जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रस्त्यावरील दुभाजकाला चारचाकी वाहन धडकले. त्यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. गाडीतील दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
Web Title: Accident CNG caught fire, burning both the police and the coal