नाशिक पुणे महामार्गावर कुत्र्याला वाचविण्याच्या नादात कारचालक ठार
Sinnar Accident: नाशिक-पुणे महामार्गावर दोडी शिवारात कारला कुत्रे आडवे गेल्याने कार पुलाला धडकून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना.
सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावर दोडी शिवारात कारला कुत्रे आडवे गेल्याने कार पुलाला धडकून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
विशाल दिनेश जाधव (३५, रा. सटाणा) असे मृत चालकाचे नाव आहे. दिनेश हे संगमनेरहून सिन्नरकडे कार क्र. एमएच १२ क्यूएफ ८०३०) ने येत होते. दोडी शिवारात त्यांच्या कारला कुत्रे आडवे गेल्याने ते त्यास वाचवण्यात गेले असता
कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्याला जाऊन आदळली. त्यात त्यांच्या डोक्यास व छातीस जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. स्थानिकांनी मदत करत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करीत आहेत.
Web Title: Accident Car driver killed while trying to save a dog on Nashik Pune highway
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App