Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर एका कारवर दुसरी कार आदळल्याने अपघात – Accident

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर एका कारवर दुसरी कार आदळल्याने अपघात – Accident

Sangamner Accident: संतवाडीफाट्या जवळ आली असता खड्डे वाचवण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्ता सोडत कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेल्याने अपघात.

Accident car collided with another car on the Pune Nashik highway

संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावरील अत्यंत मोठे अन् जीवघेणे खड्डे आता अपघातांना निमंत्रण देत असून, नुकत्याच या मार्गावर खड्ड्यामुळे झालेल्या गंभीर अपघाताने आता पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न चर्चिला जात आहे.

नाशिक-पुणे शहराला जोडणार्‍या या खड्डेमय रस्त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. संतवाडीफाटा येथे पुण्याकडे जाणारा रस्ता खचलेला असून, पडलेले खड्डे सतत बुजविण्याचा महामार्ग प्रशासनाचा प्रयत्न हास्यास्पद ठरत आहे. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गेल्या काही दिवसात अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहे. शनिवारी संतवाडीफाटा ते आळेखिंड अशा एक किलोमीटरच्या दरम्यान चार छोटे-मोठे अपघात झाले.

एक कार नाशिककडून पुण्याकडे जात होते. हि कार संतवाडीफाट्या जवळ आली असता खड्डे वाचवण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्ता सोडत कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली आणि नाशिककडे जाणार्‍या कारवर आदळली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले मात्र दैवबलवत्तर व वाहनातील एअरबॅग उघडल्याने दोन्ही वाहन चालकांचा जीव वाचला. अपघाताचे दृश्य पाहणार्‍यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जखमीला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही काळ नाशिकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Accident car collided with another car on the Pune Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here