कार व पिकअपची समोरासमोर धडक, अपघातात एक ठार, सहा जखमी – Accident
Ahmednagar | Karjat | कर्जत: अहमदनगर सोलापूर महामार्गावर नागमठाण शिवारात वॅगनर कार व पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर सहा जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री झाला.
किरण अरविंद भालेराव (रा. पुणे) असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महेश सोपान डांगे, अतुल महादू वाळुंजकर हे व व पिकअप गाडीतील चौघे जमखी झाले आहेत. याप्रकरणी महेश सोपान डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 25 जून यादिवशी ते आणि त्यांचा मित्र अतुल वाळुंजकर, किरण भालेराव हे वॅगनार कार क्रमांक (एमएच 14 जेए 5694) मधून आष्टी येथून माघारी येत होते. नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील नागमठाण शिवारात खुळ्याचा गोटा या परिसरामध्ये महामार्गाच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू आहे.
याठिकाणी कच्च्या रोडच्या पुलाजवळ अचानक पिकअप टेम्पो (क्र.एम एच 04 डीडी 8177) नगर कडून मिरजगावच्या दिशेने येत होता. अचानक पिकअप समोर आल्याने वॅगनर गाडी वरील चालक किरण भालेराव गडबडले. त्यांनी गाडीचा ब्रेक जोरात दाबला परंतु रस्त्यावर असलेल्या खडीवरून गाडी घसरून समोरून येत असलेल्या पिकअप टेम्पोवर जोरात आदळली.
यामध्ये चालक किरण अरविंद भालेराव हा जागीच ठार झाला. इतर जखमी झाले. त्यांना नगर येथे रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान या अपघातामध्ये वॅगनर कारचे व पिकअप टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Title: Accident Car and pickup collided head-on, killing one and injuring six