Home नाशिक नाशिक: सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, एक ठार तर २५ प्रवासी

नाशिक: सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, एक ठार तर २५ प्रवासी

Nashik Accident News:  सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात, बस दरीत कोसळल्याने एक प्रवाशी जागीच ठार झाला तर अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी.

Accident bus fell into a ravine at Saptashringi Fort, killing one and 25 passengers

नाशिक: नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली.  देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची ही बस थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. आज पहाटे 6.30 ते 6.45 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचं दर्शन करून भाविक येत असताना बस दरीत कोसळली.

शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने एक प्रवाशी जागीच ठार झाला तर अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले.

पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. ही बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

Web Title: Accident bus fell into a ravine at Saptashringi Fort, killing one and 25 passengers

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here