पाथर्डी | Accident: पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती पहाटेच्या सुमारास राज्य महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी रात्री करंजी घाटात चार चाकी वाहनाला आग लागली का लावली? याबाबत मात्र परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत अद्याप पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही. हे चार चाकी वाहन नेमके कोणाचे आहे वाहनाला आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मंगळवारी मध्यरात्री या चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीमध्ये हे वाहन पूर्णतः जळून खाक झालेले आहे. या घटनेबाबत अद्याप कोणीही फिर्याद देण्यास पुढे आलेले नाही माहिती महामार्ग विभागाचे पोलीस अधिकारी हमीद शेख, उपनिरीक्षक शेषराव गोल्हार यांनी सांगितले.
Web Title: Accident Burn the four wheeler