अहिल्यानगर: एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी थेट बसस्थानकातच घुसली, दोघे गंभीर जखमी
Ahilyanagar Bus Accident : एसटीने बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली.
अहिल्यानगर: जिल्ह्यातील पारनेर बस स्थानकात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी थेट बसस्थानकातच घुसल्याची घटना घडली आहे. एसटीने बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली आहे. धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहिती अशी की, सदर बस पारनेरहून मुंबईकडे जाणार होती. अशातच या बसचा ब्रेक झाल्यानं बस डायरेक्ट पारनेर स्थानकातच घुसली आहे. बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली आहे. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेमुळं पुन्हा एकदा एसटी बसच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Title: Accident brakes of the ST bus failed, the ST entered the bus station directly
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study