Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बसच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू

अहिल्यानगर: बसच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: गजानन पेट्रोल पंपाजवळील वळणावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू.

Accident Biker dies in bus collision

अहिल्यानगर: आठवड (ता. अहिल्यानगर) शिवारातील गजानन पेट्रोल पंपाजवळील वळणावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २३ जून रोजी घडली. या अपघातात मयताची दुचाकीदेखील पेटून खाक झाली.

विजु रंगनाथ गोसावी (वय ४०, रा. पुसेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयताचे चिरंजीव आदित्य विजु गोसावी (वय १८) यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या प्रकरणी एस.टी. बस चालक खुद्दास मुबारक पठाण (रा. सातेफळ, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजु गोसावी हे त्यांच्या दुचाकी (एमएच २१ बीए ७९६०) वरून अहिल्यानगरहून जामखेडच्या दिशेने जात असताना, आठवड शिवारातील गजानन पेट्रोल पंपाजवळील वळणावर, जामखेडहून अहिल्यानगरच्या दिशेने येणाऱ्या एस.टी. बस (एमएच १४ बीटी २१६२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विजु गोसावी हे दुचाकीवरून फेकले जाऊन रस्त्यावर घसटत गेल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस देखील आग लागून ती संपूर्ण जळून खाक झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Breaking News: Accident Biker dies in bus collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here