एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात, माय लेकाचा मृत्यू- Accident
Ahmednagar Accident: इसारवाडी फाट्याजवळील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर एसटी बस आणि बैलगाडीचा भीषण अपघात झाला, आई आणि मुलाचा जागीच मृत्यू, बैलगाडीचा अक्षरशः चुराडा.
औरंगाबाद: औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर आज सकाळी 6 वाजता एसटी बस आणि बैलगाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात मयत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.
एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात झाला असून, ज्यात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कलीयाबाई गोविंद गिरे आणि आर्जुन गोविंद गिरे असे मृत आई-मुलाचं नाव आहे. तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हे सर्व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मानिकपुंद येथील रहिवासी आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याच्याजवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसने (क्रमाक एमएच 14 बीटी 2500) ऊस तोडीला जाणाऱ्या बैलगाडीला जोराची धडक दिली. बसचा वेग अधिक असल्याने बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर या अपघातात बैलगाडीत बसलेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बैलगाडी चालवत असलेले मृत महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव करत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
सकाळी बस आणि बैलगाडीचा अपघात झाल्यावर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या गाड्यांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत आई-मुलाचा मृतदेह रुग्णालयात पाठवत, जखमीला उपचारासाठी रुग्णवाहिकेने पाठवून रस्ता मोकळा केला. काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत सुरु झाला आहे.
Web Title: accident between ST bus and bullock cart, death of my daughter
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App