Accident: घाटात पुलावरून कंटेनर कोसळला
मावळ | Maval : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात एक कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली. या अपघातात (accident) दोघे जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
या अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुलावरून कंटेनर खाली कोसळल्याने केबिनचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. या यंत्रणेने जखमींना केबिनमधून बाहेर काढत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Accident an container collapsed from the bridge in the ghat