Home संगमनेर संगमनेर: विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात, फोनवर बोलता बोलता….

संगमनेर: विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात, फोनवर बोलता बोलता….

Sangamner Accident: अचानक बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस विजेच्या खांबाला धडकली.

Accident of a bus full of students

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाला आहे. चालक मोबाईल फोनवर बोलत होता. अचानक बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस विजेच्या खांबाला धडकली. ज्यामुळे बस जागीच पलटी झाली. सुदैवाने कुणाचा अपघात झाला नाही. विद्यार्थी सुखरूप आहेत.

कुर्लातील झालेल्या भीषण अपघातामुळे राज्यभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. अशातच शिर्डीत एका बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थी असून, ही शाळेची बस असल्याची माहिती आहे. बसची विजेच्या खांबाला धडक बसली. ज्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले होते. ज्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे.

सावरगावतळ गावातील एका इंग्लिश स्कुलच्या बसचा ९ डिसेंबरला सकाळी अपघात झाला. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना जिव गमवावा लागला असता. पण सुदैवाने विद्यार्थ्यांनी भरलेली बसच्या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. नियमित या शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडते.

मात्र, आज चालक मोबाईलवर बोलत असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे ती थेट विजेच्या खांबाला धडकली. विजेच्या खांबाला धडकल्यामुळे बस जागीच पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांनी बसमधील मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेनंतर एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

शाळा व्यवस्थापन चक्क खाजगी बस वापरत असून नियमांची पायमल्ली केले जात आहे. तरीही शिक्षण प्रशासन शिक्षण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनासह बसचालकावर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी मागणी पालकांनी केली आहे. आता लवकर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Web Title:  Accident of a bus full of students

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here