Home पुणे भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू, मोठी खळबळ

भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू, मोठी खळबळ

Breaking News | Pune Accident: जेजुरी-मोरगाव रोडवर हा अपघात घडला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.

accident, 8 people died on the spot, big commotion

पुणे : पुण्यात अपघाताची मोठी बातमी समोर येत आहे. जेजुरी-मोरगाव रोडवर हा अपघात घडला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेया घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जखमींना लवकराच लवकर उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जेजुरी-मोरगाव मार्गावर पिकअप आणि कारची धडक झाली. या अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जेजुरीहून बारामतीकडे निघालेली एक कार उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जाऊन धडकली आणि यामध्ये पिकअप टेम्पोमधून साहित्य बाहेर काढणारे, त्याचबरोबर कारमधील काही प्रवासी अशा 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कारमधील 4 जणांचा समावेश आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात येत आहेत.

जेजुरी – मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर भरधाव वेगात आलेल्या कारने थांबलेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन शेजारीच उभा असलेल्या कारवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, जागेवरच आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. १८) सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही. तर जखमींची नावेही रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर याबाबतचा पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

Breaking News: accident, 8 people died on the spot, big commotion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here