Accident: बैलगाडीच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
पाथर्डी |Accident| Pathardi: पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू घटना घडली आहे. योगेश सोमनाथ नरोटे असे या मुलाचे नाव आहे. बुधवार दि. १० रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमार हा दुर्देवी अपघात (Accident) घडला.
या घटनेने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. योगेश हा त्याच्या आई वडिला एकुलता एक मुलगा असुन एक मोठी बहिण आहे. योगेश हा आदर्श विद्यालयात इयत्ता ७ वीत शिकत होता. घरातील आई-वडिलांबरोबर शेतीचे व घरातील छोटे मोठे काम योगेश करत होता.
योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून शेतामधून गुरासाठी चारा घेऊन घराकडे जात होता. मेळवस्ती ह्या त्यांच्या राहत्या घराजवळच योगेश हा बैलगाडीतून खाली पडला. त्यावेळी डोक्यावरून बैलगाडीचे चाक गेल्याने मोठा रक्तश्राव होऊन त्यात मृत्यू झाला.
या घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
Web Title: Accident 12-year-old boy was found dead under the wheel of a bullock cart