Home अहमदनगर अहमदनगर: ते दोघे एकाच गावातील अन, तरुणीवर अत्याचार

अहमदनगर: ते दोघे एकाच गावातील अन, तरुणीवर अत्याचार

Breaking news | Ahmednagar:  लग्नाचे आमिष दाखवुन युवकाने फसवणुक करुन बलात्कार केल्याचा गुन्हा.

Abused young woman from the same village

पाथर्डी : ते दोघे एकाच गावातील. सोबतच जनावरे चारण्यासाठी डोंगरात जात होते. घरच्यांनी त्यांची सोईरीकही जमविली. आता आपले लग्नच होणार आहे, मग तुझ्याशी मला शारीरीक संबंध ठेवू दे, असे सांगुन मुलीशी संबंधही ठेवले. काही दिवसांनी लग्नाला नकार दिला. मुलीने थेट पोलिस स्टेशन गाठले व लग्नाचे आमिष दाखवुन युवकाने फसवणुक करुन बलात्कार केल्याचा गुन्हा युवकाविरुध्द नोंदविला आहे.

पाथर्डी शहरापासुन सात ते आठ किलमोमीटर जवळच असणाऱ्या गावात ही घटना घडली. गावातील एक मुलगी रोज जनावरे चारण्यासाठी गराळ भागात जात होती. तिच्या सोबत गावातील एक युवकही जनावरे चारण्याचे काम करीत होता. दोघेही समव्यवसायी होते. मग घरच्यांनीही निर्णय घेतला की, आता दोघांचा (लग्नाचा) बार उडवुन देवु. युवकाने युवतीशी शारीरीक सबंधही ठेवले. मात्र, अचानक युवकाने लग्न करण्यास नकार दिला. युवतीने पाथर्डी पोलिस ठाणे गाठले आणि युवकाने लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Abused young woman from the same village

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here