अहमदनगर: विवाहितेला बहाणा करून लॉजवर नेऊन अत्याचार
Ahmednagar Crime: लॉजवर नेऊन महिलेशी जबरदस्ती करत अत्याचार (abused), पुणे परिसरातील घटना: कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
अहमदनगर: तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे भांडण मिटवितो, असा बहाणा करून, पुणे परिसरातील एका लॉजवर नेऊन विवाहितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २१) घडली. अत्याचारप्रकरणी तानाजी कारभारी सातपुते (रा. उक्कडगाव, ता.श्रीगोंदा) याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला गेल्या काही दिवसांपासून आई-वडिलांकडे राहत होती. तानाजी सातपुते हा बुधवारी (दि. २१) विवाहितेच्या घरी आला. त्याने तुझे व तुझ्या नवऱ्याचे भांडण मिटवू, पण त्यासाठी आपल्याला पुण्याला नातेवाइकाकडे जावे लागेल, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला पुण्याला जाण्यास तयार झाली.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
दोघे पुण्याला निघाले. सातपुते याने मध्येच थांबवून घेत, आपल्याला रात्र इथेच काढावी लागेल. आपण चहा पिऊन लॉजवर फ्रेश होऊन लगेच पुढच्या प्रवासाला निघू, असे त्याने पीडितेला सांगितले. त्यानुसार, दोघे एका लॉजवर गेले. तिथे ते फ्रेश झाले. त्यानंतर, पीडित महिला दरवाजा उघडून बाहेर पडत असतानाच, आरोपीने महिलेशी जबरदस्ती करत अत्याचार केला. त्यानंतर, त्याने तिला नगरमध्ये आणून सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: abused taking the married woman to the lodge on the pretext
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App