Breaking News | Jalna Crime: ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातून त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता अडीच महिन्यांची गर्भवती.
जालना : शहरातील गणपती गल्ली भागात मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड येथील संशयित मोहन किनगावकर याच्याविरुद्ध मंगळवारी (ता. आठ) कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील गणपती गल्ली परिसरात एकाकडे चार वर्षांपासून महिला घरकाम करते. संबंधिताचा नांदेड येथील नातेवाईक मोहन वसंत किनगावकर याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. यातून मोलकरीण आणि मोहनची ओळख झाली.
ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातून त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता अडीच महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने कदीम जालना पोलिस ठाण्यात मोहन किनगावकर याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी त्याला मंगळवारी (ता. आठ) रात्री अटक केली. त्याला बुधवारी (ता. नऊ) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक नागरे यांनी ही माहिती दिली.
Web Title: abused of maid, one arrested