महाविद्यालयीन तरुणीचे तोंड दाबून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार
Breaking News | Amalner Crime: महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा रस्त्यावर तोंड दाबून तिला रिक्षात डांबून निर्जन स्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual abused) केल्याची घटना समोर आल्याने खळबळ.
जळगाव: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा रस्त्यावर तोंड दाबून तिला रिक्षात डांबून निर्जन स्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना जिल्ह्यातील अमळनेर मध्ये उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, , दिनांक २४ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला ढेकू रस्त्यावरील शाळेत सोडण्यासाठी गेली असता बहिणीला शाळेत सोडून परत येत असताना ढेकु रोडवरील दीपक नगर जवळ तिच्या मागावर असलेल्या दिनेश रमेश भिल. रा. शांताबाई नगर. याने हाताने तरुणीचे तोंड दाबून समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याला थांबवत आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआयला सोड. असे सांगून बळजबरीने रिक्षात कोंबून रिक्षावाल्याने तेथे निर्जन स्थळी सोडल्यावर दिनेशने मुलीला बळजबरीने पिंपळे रस्त्यावरील एका बंद शाळेच्या जिन्यावरून मुलीला गच्चीवर नेले आणि तेथे त्याने तरुणीवर जबरजस्ती लैंगिक अत्याचार केला.
पीडित तरुणीने मदती साठी ओरडत होती. परंतु त्या परिसरत कोणीच नव्हते. ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, अशी धमकी दिनेश भील याने पिडीत तरुणीला दिली. त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झालेल्या झटापटीत पीडित तरुणीचे कपडे ही फाटले. त्या नंतर दिनेश भील तिला एकटे सोडून निघून गेला. घाबरलेली तरुणी पळत रस्त्यावर आलेवर तिला रस्त्यात तिचे आई, वडील भेटले. घडलेली घटना त्यांना सांगितल्यावर त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल केली. अमळनेर पोलिस स्टेशनला दिनेश भील विरुद्ध ‘पोक्सो’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत अमळनेर पोलिस उपनिरीक्षक युवराज बागूल हे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: abused of a college girl by taking her face to a deserted place
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study