Home नाशिक भूतबाधा झाल्याचे सांगून भोंदूबाबाकडून अत्याचार

भूतबाधा झाल्याचे सांगून भोंदूबाबाकडून अत्याचार

Breaking News | Nashik: पीडित विवाहितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.

Abused by Bhondubaba claiming to be demon possessed

नाशिक : पोटदुखीने त्रस्त असलेल्या सुनेला सासरचे लोक एका भोंदूगिरी करणाऱ्या कथित स्वयंघोषित मौलाना बाबाकडे इलाजासाठी घेऊन गेले होते. यावेळी त्याने पीडितेला भूतबाधा झाली असून चार दिवस इलाज करावा लागेल, असे सांगितले.

 इलाजाचा बनाव करत बंद खोलीत संशयित भोंदूबाबा आमीन हुसन यासीम शेख (वय ३२) याने पीडित विवाहितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आमीन विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या.

Web Title: Abused by Bhondubaba claiming to be demon possessed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here