Home करिअर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार, पोलीस भरतीचे आमिष अन…

स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार, पोलीस भरतीचे आमिष अन…

Breaking News  Pune Crime: पोलीस भरतीसाठी मदत करण्याचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Abuse of young woman preparing for competitive examination

पुणेः पोलीस भरतीसाठी मदत करण्याचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  २३ वर्षाच्या पीडित तरुणीने या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या ४८ वर्षीय व्यक्ती विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुणे जिल्ह्यातील आहे. मागील काही वर्षांपासून ती पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. कात्रज परिसरात ती राहण्यासाठी होती. आरोपीच्या घरी खानावळ असल्याने जेवनाचा डबा घेण्यासाठी ती रोज त्याच्या घरी जायची. यातूनच त्या दोघांची ओळख झाली होती. सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेला आरोपी हा एका संस्थेत क्लर्क म्हणून कामाला होता. त्याने पोलीस भरतीसाठी मदत करण्याचं आश्वासन देऊन पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. आणि आरोपीने 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.

दरम्यान मागील काही दिवसांपासून आरोपी या तरुणीला मारहाण करायचा. जीवन उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी द्यायचा. त्याच्या या वारंवार मारहाणीला आणि धमकी देण्याचा कंटाळून फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता ६४, ११५ (२), ३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Abuse of young woman preparing for competitive examination

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here