Home नाशिक धक्कादायक ! मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकी पेशाला काळिमा

धक्कादायक ! मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकी पेशाला काळिमा

Nashik Crime : मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर.

Abuse of the headmaster on the 6th class student

नाशिक: नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.  मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने इगतपुरीत एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्याच्या टाकेद बुद्रुक येथील शाळेत सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षक गोरख जोशी याने मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या घरी पाठवले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले.   

अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी मुलीला विचारले असता पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले. घोटी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधिक तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Abuse of the headmaster on the 6th class student

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here