अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Breaking News | Nagpur Crime: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण.
नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण केले. यातून ती गभर्वती झाली. पण नंतर याप्रकरणातील आरोपी पीडित मुलीला सातत्याने त्रास देऊ लागला. इतकेच नाहीतर त्याने ते फोटो आणि व्हिडिओही व्हायरल केले. त्यानंतर अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
साहिल सिद्धार्थ नितनवरे (वय 19, रा. डिफेंस कॉलनी, वाडी) असे आरोपीचे नाव आहे. साहिल हा बीएच्या प्रथम वर्षाला शिकतो. त्याचे वडील शेती तर आई धुणी-भांडी करते. पीडित मुलगी बी. कॉमच्या प्रथम वर्षाला शिकते. सिद्धार्थ आणि पीडिता दोघेही एकाच महाविद्यालयात आणि एकाच वर्गात शिकत होते. आठवी ते बारावीपर्यंत सोबतच होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे.
पीडिता दहावीत असताना त्याने तिला स्वतःच्या घरी नेऊन बळजबरीने अत्याचार केला. तो सतत तिचे लैंगिक शोषण करत होता. बारावीनंतर दोघेही वेगवेगळ्या महाविद्यालयातून शिक्षण घेत असले तरी त्यांची मैत्री कायम होती. या दरम्यान त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नाहीतर याप्रकाराचे व्हिडिओ आणि फोटोही काढले.
यादरम्यान पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना दोघांच्या संबंधाबाबत कळले. त्यानंतर पीडितेने त्याच्यापासून दुरावा केला. यामुळे संतापून आरोपीने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत तिची बदनामी केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Abuse of minor girl, video and photos viral on social media