Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संगमनेरमधून आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संगमनेरमधून आरोपी गजाआड

Breaking News | Ahmednagar: मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन गजाआड केले.(Arrested)

Abuse of minor girl, accused Arrested from Sangamner

राहुरी: राहुरी तालुक्यातून अपहरण करण्यात आलेल्या सहाव्या मुलीचा शोध घेण्यास पोलिस पथकाला यश आले असून या घटनेत पीडित मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर दोन आरोपींचा अद्याप शोध सुरु आहे.

राहुरी तालुक्यातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी अज्ञात तरुणा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरु सुरु असताना पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. धर्मराज पाटील, सहाय्यक फौजदार औटी, गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सागर नवले व स्वाती कोळेकर आदि पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषणावरून दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी संगमनेर येथून पीडित मुलीला ताब्यात घेऊन आरोपी परशुराम केशव निकम, वय २१ वर्षे, रा. बारागाव नांदूर, याच्या मुसक्या आवळल्या. नंतर पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

तसेच पीडित मुलीचे अपहरण करण्यास मदत करणारे सिताराम बाळासाहेब गायकवाड, वय ३२ वर्षे, व आकाश सुनील पवार, वय १९ वर्षे, दोघे रा. बारागाव नांदूर यांना पोलिस पथकाने गजाआड केले. या घटनेतील आरोपी परशुराम केशव निकम, सिताराम बाळासाहेब गायकवाड व आकाश सुनील पवार, तीघे रा. बारागाव नांदूर यांच्यावर अपहरण, बलात्कार तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या घटनेतील आणखी दोन आरोपींचा पोलिस पथकाकडून शोध सुरु आहे.

Web Title: Abuse of minor girl, accused Arrested from Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here