अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक.
अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी गुरुवारी आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. विशाल लक्ष्मण गायकवाड (रा. टाकळीमिया, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. आरोपीने पीडितेला लग्न करू, असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. त्यास संगीता रवींद्र बर्ड व रवींद्र पोपट बर्ड (दोघे रा. आगरकरमळा, नगर) यांनी मदत केली. यासंदर्भात पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी केला. त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Abuse of a young woman by luring her into marriage