Home संगमनेर संगमनेर: नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार

संगमनेर: नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार

Breaking News | Sangamner Crime: एका गावच्या शिवारात ज्वारीच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या तीस वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार (abuse) केल्याची घटना.

Abuse of a married woman who went for a natural ritual

संगमनेर: शहराजवळील एका गावच्या शिवारात ज्वारीच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या तीस वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शहराजवळील एका गावच्या शिवारात तीस वर्षीय विवाहित तरुणी ज्वारीच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेली होती.

त्याचवेळी तेथे कोणी नसल्याचा फायदा घेत नामदेव मच्छिंद्र चव्हाण (वय 33, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) याने महिलेला पाठीमागून मिठी मारून तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध केले. सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकेल अशी धमकीही दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या नातलग महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नामदेव चव्हाण याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

Web Title: Abuse of a married woman who went for a natural ritual

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here