संगमनेर: पकडलेल्या आरोपीकडून दोन खुनाचा उलगडा, धक्कादायक माहिती आली समोर
Sangamner Crime: घाटात मुलीचा मृतदेह मिळून आला होता या तपासाचा उलगडा करताना आरोपीने पिडीत मुलीचा खून (Murder) केल्याचे समोर आले असताना पैशासाठी आईची ९ महिन्यांपूर्वी हत्या केल्याचे समोर.
संगमनेर: संगमनेरमधील जुन्या घाटात मुलीचा मृतदेह मिळून आला होता या तपासाचा उलगडा करताना आरोपीने पिडीत मुलीचा खून केल्याचे समोर आले असताना पैशासाठी आईची ९ महिन्यांपूर्वी हत्या केल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याबाबत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटामध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत त्वरित तपास केला हा मृतदेह संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीचा असल्याचे तपासात समोर आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालत कसून चौकशी सुरुवात केली. त्यांचे पथक व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांनी या खून प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला. सीसीटीव्ही कॅमेरे चे फुटेज तपासण्यात आले. या अल्पवयीन मुलीचा तुषार विठ्ठल वाळुंज रा. लक्ष्मीनगर. संगमनेर याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिली.
पोलिसांनी तुषार विठ्ठल वाळुंज (वय 25 वर्ष, रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, संगमनेर) याला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पीडित मुलीला दारू जुन्या चंदनापुरी घाटात नेत तिची हत्या केल्याचे कबूल केले.
आरोपीकडे पोलिसांनी आणखी कसून चौकशी केली असता त्याने नऊ महिन्यांपूर्वी स्वतः च्या आईची पैशासाठी हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे फाईल आता उघडली गेली. सखुबाई विठ्ठल वाळुंज यांनी नऊ महिन्यांपूर्वी जानेवारीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र आता आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळाले आहे.
आरोपी वाळूजला दारू पिण्याचे व्यसन असून त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. तर आई रोजनदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आरोपीने आपल्या व्यसनासाठी आईकडे जानेवारीमध्ये पेशाची मागणी केली होती. आईने त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आईची गळफास देऊन हत्या केली. आणि तिने गळफास घेतल्याचे भासविले होते, आरोपीने आत्महत्याचे बनाव केल्याचे तपासात माहिती समोर आली आहे.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सलमान सातपुते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोरे, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबदे, आदी पथकाने ही ही कामगिरी केली आहे.
Web Title: about the two murder has come out from the arrested accused
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App