मी केवळ चालक नसून विद्यार्थ्यांचा सुरक्षारक्षक आहे: प्रा. अनिल बेंद्रे
मी केवळ चालक नसून विद्यार्थ्यांचा ‘सुरक्षारक्षक’ आहे हि भावना ठेवा -प्रा. अनिल बेंद्रे
अकोले: आपण आपल्या कुटुंबावर जसे प्रेम करतो तेच प्रेम वडीलकीच्या नात्याने बस मधील विद्यार्थ्यांवर करा. पालकांचा विश्वास आपल्यावर असल्यामुळे विद्यार्थी आपल्या स्वाधीन केलेले असतात त्यामुळे मी बसचा केवळ ‘चालक’ नसून विद्यार्थ्यांचा ‘सुरक्षारक्षक’ आहे हि भावना ठेवा. असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेच्या एम.बी.ए. विभागाचे प्राध्यापक अनिल बेंद्रे यांनी संस्थेतील बस चालक व मदतनीस यांच्याकरिता आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. यावेळी स्कूल बस साठी असलेल्या नियमांची , कायद्यांची माहिती त्यांनी दिली. काही अपघातांचे व्हीडीओ दाखवत चालक व वाहकांनी काय सतर्कता बाळगावी वर्तन व सुसंवाद कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यशाळा समितीचे सदस्य मनोज कडलग यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळा विभागाच्या अध्यक्ष राधिका नवले यांनी सर्वांचे स्वागत केले.
या प्रसंगी बस चालक अनिल उगले यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच नुकत्याच अस्मानी संकटात सापडलेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही केवळ बसचे चालक नाही तर विद्यार्थ्यांचे ‘सुरक्षारक्षक’ आहोत अशा घोषणा देत कार्यशाळेची सांगता झाली. यावेळी कार्यशाळा समितीच्या सदस्या माया सोनवणे,संस्था कार्यालयीन समन्वयक ज्योती मंडलिक उपस्थित होत्या.
Website Title: Latest News Abhinav Prof Anil Bendre