Home अहमदनगर अहिल्यानगर: दोन अल्पवयीन बहिनींचे अपहरण; ट्रक मधून पडून ऊसतोड कामगाराचा मृत्यू

अहिल्यानगर: दोन अल्पवयीन बहिनींचे अपहरण; ट्रक मधून पडून ऊसतोड कामगाराचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: दोन अल्पवयीन बहिनींचे अपहरण.

Abduction of two minor sisters

राहुरी : तालुक्यातील कोल्हार खुर्द येथून दोन अल्पवयीन बहिनींचे अपहरण करण्यात आले. (दि.९) ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेबाबत अज्ञात इसमा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील एक १७ वर्षीय व एक १४ वर्षीय अल्पवयीन मुली या चुलत बहिणी असून त्या राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात त्यांच्या कुटूंबासह राहतात. (दि.८) ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान सदर दोन्ही अल्पवयीन बहिनी जेवण करुन घराच्या पडवीत झोपी गेल्या होत्या. (दि.९) ऑक्टोबर रोजी सकाळी घरातील इतर लोक झोपेतून उठले. तेव्हा सदर दोन्ही अल्पवयीन बहिनी घरातून बेपत्ता झाल्याच्या दिसून आल्या. नातेवाईकांनी त्यांना परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यांचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

ट्रक मधून पडून ऊसतोड कामगाराचा मृत्यू

राहुरी : राहुरी फॅक्टरी परिसरात नगर- मनमाड महामार्गवर हॉटेल वने पाटील समोर धावत्या ट्रक मधून पडून एका ऊसतोड कामगाराचा नुकताच मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरपूर वरून कराड येथील साखर कारखान्यात ऊसतोड कामगारांना घेऊन जात असलेला (एमएच १८ एसी ९९६६) क्रमांक ट्रक काल बुधवारी पहाटेच्या सुमारास राहुरी फॅक्टरी परिसरातून जात होता. तेव्हा राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल वणे पाटील समोर ऊस तोडणी कामगार भारत शिवदास भिल (वय २५, रा. शिंगवे, ता. शिरपूर, जि. धुळे) हा धावत्या ट्रकमधून खाली पडल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Abduction of two minor sisters

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here