Breaking News | Ahmednagar: राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण.
राहुरी: राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. ही घटना १७ मे २०२४ रोजी घडलीय. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एका ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला व त्यांची नणंद या दोघींचे कुटुंब राहुरी तालुक्यातील ताहराबाद परिसरात राहतात. संबंधित महिलेची एक १५ वर्षीय मुलगी आहे. तर त्यांच्या नणंदची एक १६ वर्षीय मुलगी आहे. १७ मे २०२४ रोजी रात्री आठ वाजे दरम्यान दोन्ही कुटुंब ताहराबाद परिसरात असलेल्या एका जागरणाच्या कार्यक्रमात गेले होते. त्या ठिकाणाहून १५ व १६ वर्षीय दोन्ही अल्पवयीन मुलींचे कोणीतरी अपहरण करून त्यांना पळवून नेले. नातेवाईकांनी दोन्ही मुलींचा परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळुन आल्या नाहीत. दोन्ही मुलीपैकी एका मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Abduction of two minor girls
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study