Home अहमदनगर संगमनेरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

संगमनेरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar News: भिंगार शहरातूनही अल्पवयीन मुलीला पळविले.

Abduction of Sangamner's minor daughter

अहमदनगर:  शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलीस त्या मुलींचा शोध घेत आहे.

मुळची संगमनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी (वय १७) नगरमधील गुलमोहोर रस्त्यावर भाडोत्री रुमवर राहत होती. ती शिक्षणासाठी येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान रविवारी (दि. २४) दुपारी दोन ते अडीच बाजेच्या दरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर शहर गाठले. मुलीचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने त्यांनी सोमवारी (दि. २५) दुपारी तोफखाना पाली स ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. अधिक तपास सहा. पोलीस १४ उपनिरीक्षक जे.सी. मुजावर मेहेकर (जि. बुलढाणा) तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेले कुटुंब सध्या भिंगार शहरात राहत आहे. त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला (बय ) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. सदरची घटना सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मुलगी घरात नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.

Web Title: Abduction of Sangamner’s minor daughter

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here