Home पुणे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचे अपहरण, डोक्याला पिस्तूल सदृश शस्त्र लावून

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचे अपहरण, डोक्याला पिस्तूल सदृश शस्त्र लावून

Breaking News | Pune Crime: एकतर्फी प्रेमातून दोघांनी अल्पवयीन युवतीचे गुरुवारी धनकवडी भागातून आईच्या डोक्याला पिस्तूल सदृश शस्त्र लावून अपहरण केल्याची घटना.

Abduction of minor girl from one sided love

पुणे:  एकतर्फी प्रेमातून दोघांनी अल्पवयीन युवतीचे गुरुवारी धनकवडी भागातून आईच्या डोक्याला पिस्तूल सदृश शस्त्र लावून अपहरण केले. सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपास करत युवतीची नवी मुंबईतील खालापूर परिसरातून सुटका केली. मात्र, आरोपी पसार झाले.

याबाबत युवतीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून युवती आणि तिची आई गुरुवारी धनकवडी भागातून निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी युवतीच्या आईला पिस्तूलासारखे दिसणारे शस्त्र दाखवून धमकावले व युवतीला धमकावून दुचाकीवर बसण्यास सांगितले. तिचे अपहरण करून दोघे जण पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

एकतर्फी प्रेमातून तिचे अपहरण केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांना आरोपी युवतीला घेऊन मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी खालापूर परिसरात असल्याचे कळताच पोलिसांचे पथक खालापूरला पोहोचले. त्यांनी युवतीची सुटका केली. पोलिस मागावर असल्याची कुणकूण लागताच आरोपी तेथून मात्र पसार झाले. आरोपी आणि युवती ओळखीचे असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी यश कातुर्डे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Abduction of minor girl from one sided love

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here