Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण, तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल.

Abduction of minor girl Filed a case

राहुरी: राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात विकास जाधव या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यात राहते. आरोपी तरुणांबरोबर ओळख असल्याने त्या तरुणाचे मुलीच्या घरी कायम येणे जाणे असायचे. १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजे दरम्यान मुलगी व तिच्या घरातील इतर लोक जेवण करून झोपी गेले. त्यावेळी आरोपी मुलीबरोबर काही वेळ गप्पा मारून निघून गेला. त्यानंतर मुलगी तिच्या खोलीत झोपी गेली. दि.१७ जानेवारी रोजी पहाटे २.३० वाजेदरम्यान मुलीच्या आईला जाग आली. त्यावेळी मुलगी तिच्या खोलीमधून गायब झाल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी मुलीचा परिसरात शोध घेतला. परंतु ती कोठेही मिळून आली नाही. विकास जाधव हा पण घरातून निघून गेल्याचे समजले. आपल्या मुलीला त्यानेच फूस लावून पळवून नेले असावे, असा मुलीच्या नातेवाईकांना संशय आहे.

घटनेनंतर राहरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विकास कडुबा जाधव, रा. सोनवणे वस्ती, टाकळिमियाँ याच्या विरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Abduction of minor girl Filed a case

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here