Home नंदुरबार दोघींचे अपहरण! एकीवर सामुहिक अत्याचार

दोघींचे अपहरण! एकीवर सामुहिक अत्याचार

Gang Rape Case:  एका मुलीने जोरदार प्रतिकार करून स्वतःची सुटका, दुसऱ्या मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

Abduction of both Mass oppression of one

नंदुरबार : अपहरण केलेल्या दोन मुलींवर दोन तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नात असताना एका मुलीने जोरदार प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. परंतु त्यांच्या तावडीत सापडलेल्या दुसऱ्या मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उपनगर पोलिसांनी यातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक केली असून न्यायालयाने दिनांक 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून  6 जानेवारी 2025 रोजी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवार (दि.3) रोजी रात्री दहा वाजेपासून शनिवार (दि.4) रात्री एक वाजे पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेणारी मुलगी 14 वर्षे वयाची आहे तर अत्याचाराला बळी पडलेली मुलगी 19 वर्षाची आहे.

फिर्यादीनुसार,  या दोन्ही मैत्रिणी कोठली गाव दिवाळी कार्यक्रम पाहण्यासाठी जात असतांना कोठली गावच्या आश्रम शाळेच्या गेट जवळ रोहित व सुनील नावाच्या दोन जणांनी त्यांना गाठले. गावात सामसुम झाल्याचा फायदा घेवून दोघांनी दोन्ही मैत्रिणींना जबरदस्तीने मोटरसायकलवर बसण्यास भाग पाडले. मोटरसायकल वरून दोघींना कोठली गावापासून निंबोणी रस्त्याने सुमारे १ कि. मी. अंतरावर पपईच्या शेतात नेले. त्या ठिकाणी प्रथम 14 वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना तिने रोहित यास लाथ मारली त्यात त्याचा तोल गेल्याने त्याच्या तावडीतुन ती सुटुन पळुन गेली. नंतर रोहित व सुनील या दोघांनी पीडितेवर अत्याचार केला. रोहित महेंद्र वळवी (वय २१ वर्ष) आणि सुनिल सुपा ऊर्फे सुपडया वळवी (वय १९ वर्षे) दोन्ही (राहणार कोठलीचा बारीपाडा ता. जि. नंदुरबार) या दोन जणांविरोधात अपहरण करुन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे हे अधिक तपास करीत आहेत. दोन्ही तरुणांना अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना 11 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: Abduction of both Mass oppression of one

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here