अहमदनगर: यासंबंधित व्यवसायांसाठी महिलांना १५ लाख बिनव्याजी कर्ज
Breaking News | Ahmednagar: महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर.
नगर : पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर केले आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडीत ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देणार असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.
महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीत पर्यटन विभागीय उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार शरद
घोरपडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जाधव, अहमदनगर टुरिझम फोरमचे अध्यक्ष किशोर मरकड, महिला आर्थिक विकास महामंडळाचे राहुल मेणे, महिला व बालकल्याण विभागाचे अमोल गोसावी आदी उपस्थित होते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असला पाहिजे. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक असल्याचे मधुमती सरदेसाई यांनी सांगितले.
Web Title: aai mahila kendrit paryatan yojana Ahmednagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study