अहिल्यानगर: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर.
अहिल्यानगर: मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळची पाटोदा (जि. बीड) तालुक्यातील व सध्या शिक्षणासाठी अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या पीडित युवतीने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडितेच्या फिर्यादीवरून विजय दिलीप पोकळे (वय 22 रा. अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची विजयसोबत ओळख झाल्यानंतर ते एकमेकांशी फोनवरून बोलत होते. फिर्यादी राहत असलेल्या नगर शहरातील ठिकाणी येऊन विजय याने तिच्याशी शारीरिक संबंध केले होते. त्यावेळी त्याने संबंधाचे फोटोही त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. दरम्यान, सदरचा प्रकार फिर्यादीच्या आई- वडिलांना समजल्यानंतर त्यांनी विजयच्या घरी जावून त्याला त्याच्या आई-वडिलांसमक्ष समजावून सांगितले होते.
6 ऑक्टोबर 2024 रोजी फिर्यादी तिच्या नगरमधील राहत असलेल्या ठिकाणी असताना विजय तेथे आला. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीसोबतचे अश्लिल फोटो व व्हिडीओ तीला दाखविले व ते व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने शारिरीक संबंध केले. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी फिर्यादी एका मुलासोबत कॉलेजवरून घरी दुचाकीवर येत असताना विजय याने फिर्यादीच्या बहिणीला व्हिडीओ कॉल करून दुसर्या मुलासोबत फिरत असल्याचे दाखवून बदनामी केली. फिर्यादीच्या वडिलांना मेसेज करून फिर्यादीची बदनामी केली. या सर्व प्रकारानंतर पीडिताने रविवारी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विजय पोकळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: A young woman was assaulted by threatening to make the photo viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study