Home अहिल्यानगर ‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’ तरुणीने जाळ्यात अडकवत…..

‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’ तरुणीने जाळ्यात अडकवत…..

Breaking News | Ahilyanagar: तरुणीने भेटण्याच्या बहाण्याने जाळ्यात अडकवत पाच साथीदारांच्या मदतीने एका तरुणास लुटल्याची धक्कादायक घटना.

A young woman lured a young man into a trap on the pretext of meeting 

श्रीगोंदा: मामाच्या गावाला आले, भेटायला ये’ असे म्हणत तरुणीने भेटण्याच्या बहाण्याने जाळ्यात अडकवत पाच साथीदारांच्या मदतीने एका तरुणास लुटल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील चार व पुणे जिल्ह्यातील एक असे पाच मित्र आर्थिक अडचणीने त्रस्त होते आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही तरी केले पाहिजे या विचारात असतानाच श्रीगोंद्यातील एकाला फेसबुकवर सोन्याच्या ऐवजाचा फोटो दिसला. सोने खरे की खोटे पाची खातरजमा करत असतानाच फोटो पोस्ट करणाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर तरुणाच्या व्हॉटस्अॅपवर एका तरुणीचा ‘हाय’ मेसेज आला.

दोघांत चॅटींग सुरू झाले. तिने ओळखीच्या खाणाखुणा सांगितल्याने त्याचा तिच्यावर विश्वास बसला. तिने नाव, गाव सांगून स्वतःचा फोटोही शेअर केला. ‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये, अशी गळ घातली. तरुणाला विश्वास बसल्याने तोही मित्राला सोबत घेत लागलीच तिला भेटायला निघाला. श्रीगोंदा शहरापासून काही अंतर जाताच पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्याची गाडी अडविली. धमकी देत गळ्यातील सोन्याची चेन,

अंगठी, मोबाईल असा ऐवज हिसकावत पोबारा केला.

रस्ता लुटीची तक्रार तरुणाने श्रीगोंदा पोलिसांत दाखल करताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लुटारुंचा शोध सुरू केला. तपासात श्रीगोंदा शहरातील तरुणाचा गुन्ह्यात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसानी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच इतर मित्रांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली देतानाच मैत्रिणीने मदत केल्याचे सांगितले. त्याच्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासात तिघांना गजाआड केले.

Breaking News: A young woman lured a young man into a trap on the pretext of meeting 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here