Home संगमनेर संगमनेर: खरेदीसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे कानातील दागिने चोरले

संगमनेर: खरेदीसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे कानातील दागिने चोरले

Sangamner theft: महिलेने विक्री प्रतिनिधीची नजर चुकवून कानातला एक सोन्याचा जोड चोरुन नेला.

A woman who came for shopping stole gold earrings

संगमनेर: शहरातील पंकज ज्वेलर्समध्ये बुधवारी (दि. ११) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन महिला दुकानात सोने खरेदीसाठी आल्या होत्या. त्यातील एका महिलेने विक्री प्रतिनिधीची नजर चुकवून कानातला एक सोन्याचा जोड चोरुन नेला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी, पंकज ज्वेलर्समध्ये सोन्याचे कानातले दागिने खरेदी करण्यासाठी दोन महिला बुधवारी आल्या होत्या. त्यावेळी विक्री प्रतिनिधी ओमकार जयपाल चित्तम (वय २४, रा. संगमनेर) यांनी त्यांना सोन्याचे सहा ते सात जोड दाखवले. त्यापैकी त्यांनी एक जोड खरेदी करुन दुकानातून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दुकानातील स्टॉकचा हिशोब चालू असताना लक्षात आले की स्टॉकमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातले जोडपैकी एक जोड कमी आहे. तेव्हा त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज बघितले असता सोने खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेने ते चोरुन नेल्याचे त्यात दिसले. सदरची महिला कायम येथे सोने खरेदी करत असल्याने तिचा मोबाईल नंबर होता. त्यावर महिलेस फोन करुन विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, सीसीटीव्ही फुटेजबाबत माहिती देऊनही ती महिला ऐकण्यास तयार नव्हती.

शेवटी विक्री प्रतिनिधी ओमकार चित्तम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी महिला हिच्या विरुध्द ३१ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा कानातला एक जोड चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश हासे करत आहेत.

Web Title: A woman who came for shopping stole gold earrings

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here