धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार
Pune Crime: धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना.
पुणे: पुण्यामध्ये पतीने कात्रीच्या सहाय्याने पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या लोहगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. लोहगाव पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये धर्मांतर करण्यासाठी दोघांनी ३२ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असून एका जिम ट्रेनरकडे जिम लावण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघांची ओळख झाली. यानंतर तिला धर्मातर करण्यासाठी प्रवृत्त करून एका ५५ वर्षे आरोपी आणि ३० वर्षीय आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ते महिलेला देत होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणात २ पुरुषांसह एका महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
Web Title: A woman was gang-raped at gunpoint for converting
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News