धकाक्दायक! महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यावर हल्ला करत हत्या
Breaking News | Baramati Murder: महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना.
बारामती: बारामती येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
सोमवारी (ता. 30) सकाळी अकराच्या सुमारास एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सदर विद्यार्थी जखमी झाला होता, त्यानंतर त्याला दवाखान्यात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर महाविद्यालयाच्या आवारात तातडीने पोलीस पोचले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याबरोबर आणखीन एक युवक यात सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यामध्ये दोन्ही अल्पवयीन मुले असून ज्या विद्यार्थ्यांचा खून झाला तो देखील अल्पवयीन असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले. एक महिन्यापूर्वी पार्किंग मध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा मनात राग धरून हा हल्ला केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या विद्यार्थ्यांचा खून महाविद्यालयाच्या परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला.
Web Title: A student was attacked and killed in the college premises
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study