धक्कादायक! शाळेतील बसचालकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
Vardha Crime: खासगी शाळेतील बसचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वर्धा: एका खासगी शाळेतील बसचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बालिकेस धमकावून तो तिला आपल्या दुचाकीवर त्याच्या महाबळ या गावी घेवून गेला. तिथे त्याने रात्रभर तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बसचालक अरविंद सुरेंद्र पारधी या नराधमाची शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीशी ओळख वाढवली. मुलीच्या अबोधपणाचा लाभ घेत त्याने तिचा विश्वास संपादन केला.
दोन दिवसांपूर्वी आरोपी अरविंद हा बालिका राहत असणाऱ्या दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात पोहोचला. बालिकेस धमकावून तो तिला आपल्या दुचाकीवर त्याच्या महाबळ या गावी घेवून गेला. तिथे त्याने रात्रभर तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राच्या कारने तिला कान्होलीबारा येथे नेले.
मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी दहेगाव पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांना आरोपी महाबळ येथे न सापडल्याने त्यांनी प्राप्त माहितीच्या आधारे खडकी येथे धाव घेत पीडित बालिका व आरोपीस अटक केली. कार व मोटर सायकलही जप्त करण्यात आली असून, आरोपी अरविंद विरोधात पोक्सोसह अन्य आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Web Title: A school bus driver rape a minor student
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App