Home उस्मानाबाद हॉटेलात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड; गुन्हे दाखल

हॉटेलात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड; गुन्हे दाखल

Prostitution Business: चार महिलांची केली सुटका : मोबाईल व रोख रक्कम हस्तगत.

A raid on the prostitution business going on in the hotel

उस्मानाबाद : शहरात एका हॉटेलात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून हॉटेलचालक महिला व हॉटेलमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात अडकलेल्या चार महिलांची सुटका केली.

उस्मानाबाद शहरातील एका हॉटेलात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी उस्मानाबाद- तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल सरिता मध्ये बनावट ग्राहकास पाठवून व्यवसाय सुरू आहे का नाही, याची खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच हॉटेलवर छापा टाकून हॉटेलची तपासणी केली.  त्यावेळी हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये चार महिला आढळून आल्या.

आश्रय देऊन व्यवसाय करण्यास भाग पाडत असे

■ पोलिसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता, ४९ वर्षीय हॉटेल चालक महिला त्यांच्याकडून वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे समोर आले.

■ हॉटेलचालक महिला तिची उपजीविका भागवत असल्याचे उघड झाले. यावर पथकाने हॉटेलचालक महिलेस अटक करून तिच्या ताब्यातील एक मोबाईल व ४ हजार ५०० रुपये हस्तगत केले.

■ पोलिसांनी संबंधित वेश्या व्यवसाय करणाया त्या ४ महिलांची सुटका करून हॉटेल चालक महिलेसह हॉटेलमालक या दोघांविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A raid on the prostitution business going on in the hotel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here