Home गोंदिया अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

Breaking News | Gondiya Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. नंतर तिची निघृण हत्या करण्यात आली.

A minor girl was raped and killed

गोंदिया: जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोटानपार येथे शुक्रवारी (१९ एप्रिल) लग्नकार्यात आलेल्या १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. नंतर तिची निघृण हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी उघडकीस आल्याने जिल्हा हादरला आहे.

गोटानपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश ऊर्फ रॉकी आणि देवरी तालुक्यातील गोटानपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता ऊर्फ लता यांचा १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता विवाह होता. याच

लग्नात सहावीत शिकणारी बारा वर्षीय मुलगी पालकांसह आली होती. नराधमांनी अंधाराचा फायदा घेत तिचे अपहरण करून गावाशेजारील जंगलात घेऊन गेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. डोक्यावर जबर मारहाण करून तिचा खून केला. सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तिचा मृतदेह आढळला. घटनाक्रमावरून ही घटना सामूहिकरीत्या करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप एकाही संशयिताला अटक केलेली नव्हती.

Web Title: A minor girl was raped and killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here