धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार
Breaking News | Rape Crime: 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील ढेरंगे वस्ती येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यातील आरोपीला पोलिसांनी परभणीतून ताब्यात घेत अटक केली.
दुर्गादास रेशीम मकर असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथून 20 जुलै 2024 रोजी एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. यामध्ये पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. असे असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यात अपहरण झालेली मुलगी परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी परभणी येथे जात या मुलीसह त्याच्यासोबत असलेल्या दुर्गादास मकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीकडे चौकशी केली असता दुर्गादास याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिला परभणी येथे नेले. नंतर मंदिरामध्ये तिच्या गळ्यात हार घालत लग्न केल्याचे भासवले.
एका खोलीमध्ये ठेवून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला असल्याचे मुलीने पोलिस चौकशीत सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी सदर अपहरणबाबतच्या गुन्ह्यामध्ये बाल लैंगिक अत्याचारासह अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करत दुर्गादास रेशीम मकर (रा. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी) याला ताब्यात घेत अटक केली आहे.
Web Title: A minor girl was kidnapped and abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study