नदीपात्रात बैलगाडी उलटून महिलेसह एका मुलीचा मृत्यू
बोलठाण | नाशिक: नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाने चांगलेच धुतले आहे. बैलगाडी नदीपात्रात उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून बैलगाडीने घरी परतणाऱ्या एक शेतमजूर महिलेसह दोन नात्याने असलेल्या चुलत बहिणी जातेगाव परिसरातील खारी नदी (river) पार करीत असताना बैलगाडी उलटल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील शेतमजूर महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या एका मुलीचे शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे एकच शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात महादेव डोंगर व आडगांव परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस झाला. शेतकरी शेतमजूर जातेगांव हद्दीतील खारी नदीच्या मार्गातून घरी जात असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने आडगांव येथील शेतमजूरांना पाण्याचा अंदाज आल्याने बैलगाडी पाण्यात उलटली. पाण्याच्या प्रवाहात सापडलेल्या पाच शेतमजूरांची पाण्यातून कशीबशी झाली परंतु मिनाबाई दिलीप (वय ४५), साक्षी अनिल सोनवणे व कु. पूजा दिनकर सोनवणे (वय सर्व रा. आडगांव ता. कन्नड, पाण्याच्या प्रवाहात जातांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने हाती लागू शकल्या नाही. या घटनेची वार्ता परिसरात पसरली. यावेळी पोलिस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. शोधण्याचे कार्य सुरू केले असता मिनाबाई दिलीप बहिरव साक्षी सोनवणे मृतदेह पोलिस प्रशासन नागरिकांच्या अथक प्रयत्नांतून शोधून काढण्यात यश आले. तर दिनकर सोनवणे हिचा शोध घेण्याचे काम आहे. या दुर्घटनेमुळे घाटमाथा परिसरात शोककळा पसरली आहे.
Web Title: A girl and a girl were killed when a bullock cart overturned in a river basin