Home अकोला संतापजनक: मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार

संतापजनक: मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार

Akola Rape Case: मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पती घरात नसताना आरोपीने विवाहितेवर लैंगिक अत्याचार. अश्लील व्हिडीओचे भय दाखवून ब्लॅकमेलिंग.

A friend rape a friend's wife

अकोला : अकोल्यातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार (Rape) केला आहे. पीडितेचा पती घरी नसताना आरोपीने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर अश्लील व्हिडीओचे भय दाखवून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय पीडित महिला ही तिच्या पती व लहान मुलासोबत रामदास पेठ पोलिस स्टेशन परिसरात राहते. दरम्यान, पीडितेच्या घरी खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील रहिवासी शेख रिजवान शेख अहमद याचे येणे-जाणे सुरू राहायचे. पीडितेचा पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर ती घरात एकटी राहत असल्याचे आरोपी शेख रिजवान शेख अहमद याच्या लक्षात आले.

3 जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेख रिजवान याने पीडितेच्या घरात प्रवेश करत पीडितेला मारहाण केली, तसेच पीडितेला धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. यानंतर, तीन वेळा आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी आरोपी शेख रिजवान याने अमरावती येथील मुजफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या इमरान खान रमजान खान नामक मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

तसे न केल्यास पीडितेचे अश्लील व्हिडीओ, तसेच छायाचित्र काढून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत, पीडितेवर दोघांनी अत्याचार केला. दोघांच्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने पतीसोबत रामदासपेठ पोलिस ठाणे गाठले व आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.  यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 376 (२), (एन), 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A friend rape a friend’s wife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here