Home अहमदनगर साडेपाच वर्षांच्या शाळकरी मुलीवर शिक्षकानेच केला अत्याचार; अहमदनगर मधील शिक्षक

साडेपाच वर्षांच्या शाळकरी मुलीवर शिक्षकानेच केला अत्याचार; अहमदनगर मधील शिक्षक

Breaking News | Beed Crime: एका शाळेत साडेपाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार (abused) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर.

A five and a half year old school girl was molested by the teacher himself

बीड: राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाही.  त्यात दोन दिवसांपूर्वी येथील एका शाळेत साडेपाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.

राहुल अंबादास वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलीची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तर या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्हीची तपासणी केली.

हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेण्यात आली. शिक्षकांच्या फोटोमधून सदरील चिमुरडीने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास अटक केली आहे.

Web Title: A five and a half year old school girl was molested by the teacher himself

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here