अहमदनगर: महाविद्यालयीन तरुणीला हॉटेलवर नेवून अत्याचार
Breaking News | Ahmednagar: पीडित तरुणीला कशाचे तरी आमिष दाखवून हॉटेल मध्ये नेऊन वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नगर : महाविद्यालयीन तरुणीला हॉटेलवर नेवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २२ डिसेंबर २०२२ ते १० एप्रिल २०२४ दरम्यान घडली. चेतन संतोष सरोदे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, वरील आरोपीने पीडित तरुणीला कशाचे तरी आमिष दाखवून हॉटेल रत्नदीप, हॉटेल साईरत्न येथे नेवून २२ डिसेंबर २०२२ ते १० एप्रिल २०२४ दरम्यान वारंवार अत्याचार केला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक महाले करीत आहेत.
Web Title: A college girl was taken to a hotel and raped
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study