प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या, हत्येनंतर संशयित तरुणाचा इंस्टाग्राम रिल्स
Breaking News | Crime: प्रेम प्रकरणातून तरुणाने एखा महाविद्यालयीन तरुणीची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
सांगली : सांगलीतील जत हत्येच्या घटनेनं पुन्हा हादरलंय. प्रेम प्रकरणातून तरुणाने एखा महाविद्यालयीन तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षता सदाशिव कोरे असं मृत महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. अक्षता कोरे ही जतमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सोमवारी सकाळी ती महाविद्यालयातून तिच्या मित्रासमवेत महाविद्यालयाजवळ असणार्या निर्जनस्थळी गेली होती. त्याच ठिकाणी अक्षताच्या प्रियकराने तिचा गळा दाबून तसेच तिच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली. घटनास्थळी झालेल्या झटापटीमध्ये पडलेल्या तरुणाच्या ओळखपत्रावरून एकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हत्येचा प्रकार उघडकीस येताच जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारीदेखील दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे हत्या झाल्यानंतर संशयित आरोपी तरुणाने इंस्टाग्राम रिल्स बनवलं आहे.
Web Title: A college girl was killed over a love affair
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study