अवघ्या ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Kalyan Crime News: 46 वर्षीय परप्रांतीय नराधमानं शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबातील 9 वर्षाच्या अल्पवीयन मुलीचा विनयभंग करून अश्लील कृत्य केल्याची घटना.
कल्याण: चार दिवसांपूर्वीच कल्याणमधीलहायप्रोफाईल सोसायटीचे मराठी विरुद्ध परप्रांतीय शेजाऱ्यांचा वाद राज्यभर गाजले. असं असताना डोंबिवलीतील 46 वर्षीय परप्रांतीय नराधमानं शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबातील 9 वर्षाच्या अल्पवीयन मुलीचा विनयभंग करून अश्लील कृत्य केल्याची घटना घडली. या घटनेचा जाब परप्रांतीय आरोपी नवरा बायकोकडे पीडित मुलीच्या आई वडिलांनी विचारला असता त्यांनी मराठी दांपत्याला बेदम मारहाण केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडील अडवली ढोकडी परिसरातील एका सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर आई वडिलांसोबर राहते. तर आरोपी नवरा बायको हे याच सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहतात. शनिवारी (21 डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी खेळत असताना आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीनं स्वतःच्या रुममध्ये नेऊन तिचा विनयभंग करून अश्लील कृत्य केलं.या घटनेमुळं पीडित मुलगी घाबरून तिच्यासोबत घडलेला प्रकार तिनं आईला सांगितला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास परप्रांतीय नराधमाला पीडित मराठी कुटुंबानं जाब विचारला असता वाद झाला. या वादातून परप्रांतीय आरोपी नवरा बायकोनं पीडित मुलीच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तम रामकुमार पांडे आणि त्याची बायको रीना अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.
Web Title: A 9-year-old girl was sexually assaulted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News