Home क्राईम धक्कादायक: तीन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने केले लैंगिक अत्याचार

धक्कादायक: तीन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने केले लैंगिक अत्याचार

A 55-year-old man sexually assaulted three minor girls

वर्धा : गिरड पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये सिल्ली गावातील खेळत असलेल्या तीन अल्पवयीन लहान मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार (Sexually assaulted ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत आरोपी केशव वानखेडे यास गिरड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  शुक्रवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळी सिल्ली गावात तीन अल्पवयीन मुली खेळत असताना गावात काम करण्यासाठी आलेल्या या नराधमाने त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी यातील एका मुलीने या नराधमापासून आपली सुटका करीत पळ काढत हा प्रकार आईला सांगितला.

गावामधील नागरिकांना याबाबत माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा नराधम दोन मुलीवर अत्याचार करतांना आढळून आला. यावेळी नागरिकांनी केशव बावसु वानखेडे याला पकडून पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली.

पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तिन्ही पिडीत मुलींना वैद्यकीय तपासणी पाठविण्यात आले आहे. तसेच आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात साय्यक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे करीत आहे.

Web Title: Wardha Crime News A 55-year-old man sexually assaulted three minor girls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here