विवाहबाह्य संबंधांचा भयावह शेवट, नवऱ्याहून वयाने मोठा, ३५ वर्षीय विवाहितेचा जीव जडला
Breaking News | Nagpur Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा छळ केला. छळ असह्य झाल्याने पतीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
नागपूर : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा छळ केला. छळ असह्य झाल्याने पतीने आत्महत्या केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीला अटक केली. दुर्गेश्वरी वय ३५ असे अटकेतील तर राहुल मनोहर वय ४५ असे फरार आरोपीचे नाव आहे. नरेंद्र वय ४१, रा. गोधनी रेल्वे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. (Love affair)
दुर्गेश्वरी व राहुलचे संबंध आहेत. याबाबत नरेंद्र यांना कळाले. त्यावरुन त्यांचे दुर्गेश्वरीसोबत नेहमी खटके उडायचे. राहुल व दुर्गेश्वरीने नरेंद्र यांचा अपमान करीत त्यांना मारहाण केली. शिवीगाळही केली. त्यामुळे नरेंद्र तणावात राहायला लागले.
१७ फेब्रुवारीला सकाळी नरेंद्र यांनी लोखंडी हुकला दुपट्टा बांधून गळफास घेतला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान दुर्गेश्वरी व राहुलने मारहाण केल्याने नरेंद्र यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दुर्गेश्वरीला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: A 35-year-old married woman, older than her husband, died after a gruesome end love affair